fbpx

शिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे 

aaditya thakray

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण ऐकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, आमदार यांनी लोकांच्या सेवेसाठीच राजकारण केले, असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. स्थानिक स्वातंत्र्य मैदानावर सोमवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झाला. शिवसेनेने २०१२ मध्ये मुंबई येथे ७५ गावांना पाणीटँकर, धान्य दिले. २०१३-१४ मध्ये मराठवाड्यात ४०० गावांना मदत केली. बिडमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांचे सामूहीक विवाह सोहळा आयोजित करून १११ जोडप्यांचे लग्न लावले. यापुर्वी मार्च ते एप्रिल या महिन्यात दुष्काळ असायचे; मात्र आता ऑक्टोबर पासूनच राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ते म्हणाले की, आत्महत्याचा विचार कधी मनात आणू नका. मदतीची हाक मारायची असेल तर सेनेला हाक मारा ती तुमच्यासाठी धावून येईल. कधी रडायचं नाही, लढायचं. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त लोकांना दिलेले मदतीचे त्यांनी कौतूक केले.

1 Comment

Click here to post a comment