आदित्य ठाकरे हे नवीन ‘पप्पू’ – आप

aditya thakarey

टीम महाराष्ट्र देशा : युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आम आदमी पार्टीने सडकून टीका केली आहे. अपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी ट्वीटरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आदित्य ठाकरे हे नवीन पप्पू आहेत असं ट्वीट केले आहे.

आदित्य ठाकरे हे नवे पप्पू आहेत असं म्हणत प्रीती मेनन यांनी #PappuThackery हा हॅशटॅगही त्यांनी ट्रेन्ड केला आहे. तसेच त्यांच्या आरे बचाव मोहिमेबाबत वापरलेल्या शब्दांचा आणि कृतीचा परस्पर संबंध नाही असंही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला होता.

आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कोणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही असं विधान केले होते. त्यामुळे मेनन यांनी हे ट्वीट केले आहे. दरम्यान, मुंबईतील पर्यावरण वाचवण्यासाठी शिवसेनेसह अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यात सिनेकलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.