नाशिक : राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वांना मास्क शक्तीपासून मुक्ती मिळणार का? या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी मास्क सक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज असल्याचे म्हंटले आहे.
२७ जाने.रोजी नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘मास्क सक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे. तसेच कोरोनाची साथ संपली आहे असे अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नाही. त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की जर आपल्याला स्वत:ला वाचवायचे असेल, तर आत्तापर्यंतचे सर्वाच चांगले शस्त्र मास्क आहे’, असे आदित्य म्हणाले.
दरम्यान, याच मुद्द्यावरून बोलतांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) म्हणाले की,‘इतर देशांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, तसेच निर्बंध देखील कमी करण्यात आले आहेत. परंतु भारतामध्ये कोरोनासोबत जगण्यासाठी नवी नियमावली बनवायला हव’, असे टोपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
निर्णय असंवैधानीक, सभागृहाबाबत निर्णयाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही-प्रकाश आंबेडकर
“मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल”, भातखळकरांचा हल्लाबोल
U-19 WC : पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरीत धडक
भाजप ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा