कोरोनाशी लढण्याचे आत्मबळ आपल्या आदिम संस्कृतीततच

प्रा लक्ष्मण हाके : गावच्या वेशीतून (वाचा आणि थंड बसा)…. कोरोना ने जगभर थैमान घातलंय,मी आज पुण्यासारख्या शहरात राहतोय,शिकलोय सवरलोय, पण गावची वेस काही केल्या मनातून जात नाही,नजरेसमोर येते ती कडकलक्षुमी ची प्रतिमा, माझे आजोबा धनगरी ओव्या म्हणायचे, गावगाड्यातील खेडूत लोकांच्या रूढी परंपरा मला समजावून सांगायचे, मरीआई चा फेरा एकदा मला त्यांनी समजावून सांगितला होता,गावावर साथ आली होती, गावचं ग्रामदैवत ब्राह्मनाथ गावच्या वेशिवरून हाती कुऱ्हाड घेऊन फिरला होता, गावाचं रक्षण त्याने केलं होतं.

अशी प्रत्येक गावात एक पांढरी चा धन्या असायचा,म्हसोबा हा प्रत्येक गावात ठरलेला असायचा, आणि आजही तो आहे, खेडूत माणूस, कुणबी माणूस त्याची आज्ञा घेतल्याबिगर आजही कोणत्याही गोष्टीला हात लावत नाहीत,ग्रामसंस्कृतीने ज्या ज्या पात्रांना जन्म दिला ती पात्रे अजही विज्ञान युगामध्ये जशीच्या तशी घट्ट पाय रोवून उभी आहेत, कडकलक्षुमी, जानाई,मरीआई, जरी- मरी, साती आसरा,ही पात्रे ग्रामसंस्कृतीचे वाहक आजही बनून राहिले आहेत, मानवी आकलनशक्ती च्या आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या पंचमहाभूताना आळवत आळवत काही रूढी परंपरा जन्माला घातल्या,खेडे गावातील जीवन संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे

अनुभवाच्या जोरावर म्हणा अथवा निसर्गाच्या अतींद्रिय शक्तीला शरण जाऊन म्हणा गावच्या वेशीवर काही देव बसवले, पूजा अर्चा ठरली, नक्षत्रे ठरली, येतं वर्ष सुखाचं समाधानाचं जावं म्हणून गावोगाव जत्रा भरत आल्या, आजही चालू आहेत.धनगरांच्या जत्रेत भाकनुक हा कार्यक्रम आजही मोठ्या भक्तिभावाने आयकल्यावरच वर्षभराचं नियोजन ठरतं,धनगरांनी तर ही संस्कृती आजही जोपासली आहे, बिरुदेवाच नमन गात असताना प्रथम या पंचमहाभूताना नमन केलं जातं, दैवी वरदहस्त नेहमी शिरावर असावा अशी प्रार्थना केली जाते,हीच ग्रामदैवतं खूप शीघ्रकोपीआणि तामसी प्रवृत्तीची दिसून येतात.दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, महामारी अश्या अनेक संकटापासून वाचण्याचे मुख्य हत्यार म्हणजे ही ग्रामदैवत, गावच्या वेशीवर बसलेली, गावचं सरंक्षण करणारी.

तुम्ही म्हणाल की हाके सर तुम्ही अंधश्रद्धा पाळता की काय? मी विज्ञान मानतो, विज्ञानवादी आहे.पण हजारो वर्षे झाली ही ग्रामसंस्कृती आजही टिकून आहे.इसवीसन सुरू झाल्यापासून,म्हणजे ००पासून ते इसवीसनाच्या१५००पर्यंत या देशात १०९ वेळा महामारी आली आहे,१८९४ ते १९०० या चार वर्षात देशात सर्व राज्यात साथीने थैमान घातले होते, इंग्रजांचा अंमल तेव्हा देशात होता,प्लेगच्या साथीने पुण्यात थैमान घातले होते,मुंबई भागात जिथे जिथे इंग्रज वसाहती होत्या त्या ठिकाणी वेशीवर येशू ख्रिस्त चा क्रउस लावले होते.

आज जगभरात कोरोना ने थैमान घातले आहे, लस येईल, विज्ञान त्यावर मात करेलही, पण अशा साथीशी लढण्याचं आत्मबळ कुठे मिळेल ???
गावची वेस आडवून कोरोना थांबेल का??? गावोगाव बंध केलेले मंदिरांचे दरवाजे तोडून देव बाहेर येऊन गावच्या वेशी ना संरक्षण देतील का ????

विज्ञान-संस्कृती-रूढी-परंपरा-मिथस-भूतकाळ एकत्र येऊन त्याचा अभ्यास होईल का ????चला कोरोनाला हरवू या??चला कोरोनाला हरवू या ??
लक्ष्मण हाके