आधार कार्ड सोबत आता हे ही कराव लागणार लिंक .

aadhar card

वेबटीम-मोबाईल नंबर नंतर लवकरच वाहन चालक परवाना आधार कार्डला जोडण्यात येणार आहे. यासाठीची तयारी सरकारकडून सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली.

याआधी मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड आधार कार्डला जोडणे बंधनकारक करण्यात आले. यानंतर आता वाहन चालक परवानादेखील आधार कार्डला जोडण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केल्याचेही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. ते डिजिटल हरियाणा समीट २०१७ या कार्यक्रमात बोलत होते.
आम्ही मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला. आता वाहन चालक परवाना आणि आधार कार्ड जोडले गेल्यास बोगस परवाने रोखण्यात मदत होईल. आधार कार्ड ही व्यक्तीची वैयक्तिक नव्हे, तर डिजिटल ओळख आहे

डिजिटल शासन नेहमीच चांगले असते, असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. याआधीही प्रसाद यांनी वाहन चालक परवाना आणि आधार कार्ड जोडण्यासंदर्भात भाष्य केले होते. बोगस वाहन चालक परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येईल, असे त्यावेळी प्रसाद म्हणाले होते. बोगस वाहनचालक परवाना मिळवणाऱ्या; तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यास यामुळे मदत होईल, असेही त्यांनी सांगितले होते.