मतदार यादीला आधार लिंक, सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन

मतदार यादी आणि आधार कार्ड लिंक करण्याची बाब सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. मतदारयादी अपडेट करण्याचे काम प्रत्येक वर्षी सुरू असते. काही नावे वगळली जातात, काही नावे नव्याने समावेश होतात. नवमतदारांची संख्या वाढली तर काही नावे मतदान केंद्रनिहाय विभागली जातात.

आधार कार्ड लिंक केल्यास मतदार यादीतील अनेक त्रुटी निघून जातील. ओळख पटवणे सरळ बाब होईल. दुबार मतदान, डमी मतदार, गठ्ठा मतदार अशा त्रुटींवर कायमस्वरूपी मार्ग निघू शकतो. १८ वर्षांवरील बहुतांश व्यक्तींनी आधार कार्ड नोंदणी केलेली आहे. दोन वर्षांपूर्वीच आधार कार्ड मतदान यादीशी लिंक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

मात्र सध्या ही बाब सुप्रिम कोर्टाच्या विचाराधीन आहे. यातून पुढील काळात या मुद्द्यावर विचारविनिमय होऊन त्याची स्पष्टता होईल, असे सहारिया यांनी स्पष्ट केले.