महाराष्ट्रात ९२ टक्के नागरिकांना आधार कार्ड

aadhar karj mafi online adhaar

मुंबई  : डिसेंबर 2017 अखेर देशात 88.5 टक्के नागरिकांना आधार कार्डाचे वितरण झाले आहे तर महाराष्ट्रात 92.6 टक्के नागरिकांना आधार कार्ड वितरित झाली आहेत. देशातील 116 कोटी 54 लाख 28 हजार 377 नागरिकांना 31 डिसेंबर 2017 अखेर आधार कार्ड देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 11 कोटी 79 लाख 1 हजार 189 नागरिक आधार कार्डाशी जोडली गेली आहेत, हे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 92.6 टक्के इतके आहे.

पाच वर्षाखालील 40 लाख बालकांना आधार राज्यातील पाच वर्षांखालील 99 लाख 62 हजार 603 बालकांपैकी डिसेंबर 2017 अखेर 40 लाख 90 हजार 152 बालकांची आधार आधार नोंदणी झाली आहे, हे प्रमाण 41.1 टक्के इतके आहे. देशातील 43.5 टक्के बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. देशातील पाच वर्षांखालील 12 कोटी 29 लाख 58 हजार 749 बालकांपैकी 5 कोटी 34 लाख 75 हजार 434 बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे.

अठरा वर्षाखालील 2 कोटी किशोरवयीनांना आधार महाराष्ट्रातील पाच ते अठरा वयोगटातील 2 कोटी 95 लाख 9 हजार 486 किशोरवयीन युवकांना2 कोटी 39 लाख 6 हजार 897 युवकांना आधार कार्ड देण्यात आली आहेत. राज्यातील आधार नोंदणीचे हे प्रमाण 82.6 टक्के इतके आहे.

देशातील 36 कोटी 10 लाख 54 हजार 369 पाच ते अठरा वयोगटातील बालकांपैकी 27 कोटी 67 लाख 42 हजार 327 बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे, देशपातळीवरील आधार नोंदणीचे हे प्रमाण 76.6 टक्के इतके आहे.