‘आधार’मुळे लागला तब्बल ५०० हरवलेल्या मुलांचा शोध

aadhar card

टीम महाराष्ट्र देशा: एकीकडे आधार कार्ड वरून देशात चालू असलेला वाद व त्यावरून चालू असलेल राजकारण हे काही नवीन नाहीये पण, आधार चे देखील तितकेच फायदे आहेत. आधार कार्ड वरून देशात मागील काही महिन्यात तब्बल ५०० हरवलेल्या मुलांचा शोध लागला आहे. युनिक आयडेंटीफिकेशन आथोरीटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांड्ये यांनी एका कार्यक्रमात याबद्दल माहिती दिली आहे.

Loading...

मागील काही महिन्यामध्ये ५०० पेक्षा जास्ती हरवलेल्या मुलांची आधार कार्ड च्या मार्फत माहिती मिळाली आहे. आधार कार्ड अनिवार्य केल्यापासून ज्या वेळी अनाथालयांमधील मुलांचे आधार कार्ड काढण्याचे काम चालू असताना त्यावेळी जवळपास ५०० पेक्षा जास्ती मुलांचे १२ अंकी सांकेतिक कोड आधीच काढण्यात आला असल्याच समजल आणि त्यावरूनच ५०० हरवलेल्या मुलांचा शोध लागला असल्याची माहिती अजय भूषण पांड्ये यांनी दिली आहे. त्यामुळे आधार जेवढ वादात आहे तेवढाच उपयोगी देखील असल्याच या प्रकरणामुळे समोर आले आहे.Loading…


Loading…

Loading...