fbpx

आघाडीची पुणे लोकसभा जागा ‘कॉंग्रेसच’ लढवणार

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ४० लोकसभा मतदार संघाची आघाडीची चर्चा पूर्ण झाली होती, उर्वरित ८ जागांसाठी आघाडी मध्ये मतभेद होते त्याच जागांपैकी बहुचर्चित असलेली पुणे लोकसभा जागा आता कॉंग्रेसच लढणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. या जागेवरच राष्ट्रवादीने सुद्धा आपला हक्क सांगितला होता त्याचाच एक भाग म्हणून गेले काही दिवस पुण्याचा जागे वरून दोन्ही पक्षात खेचा-खेची सुरु झाली होती.

आघाडीच्या जागा वाटपावर मुंबई मध्ये झालेल्या बैठकी मध्ये ही  जागा कॉंग्रेसला कायम राखण्यात यश आले. नगर , रत्नागिरी – सिंधुदुर्ग , नंदुरबार , यवतमाळ, औरांगावाद आणि रावेर या सहा जागांवरून अद्याप दोन्ही पक्षात मतभेद आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या सोबत आघाडीने जागा वाटपावर आज चर्चा केली.