वरातीत नाचताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

An electrician who went to cut the power connection was beaten in Parbhani

औरंगाबाद : मित्राच्या विवाहात नाचताना रस्त्याशेजारील विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील कच्ची घाटी येथे घडली. सचिन गोरखनाथ आरते (२४, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, सचिनच्या मित्राचा लग्नसमारंभ कच्ची घाटी येथे रविवारी रात्री आयोजित केला होता. लग्नाची वरात निघाल्यानंतर नवरदेवासमोर डीजेच्या आवाजात सर्व जण डान्स करत होते. दरम्यान वरात जात असलेल्या रस्त्यावर विनाकठड्याची विहीर आहे. अंधारात सचिनला ही विहीर दिसली नाही.

नाचत असताना तो घसरून विहिरीत कोसळला. विहिरीत पाणी जास्त असल्याने त्याला पोहता आले नाही.
यावेळी उपस्थितांनी त्याला तत्काळ विहिरीतून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या