लग्नात नाचत असलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

varat

औरंगाबाद : मित्राच्या लग्नात वरातीमध्ये नाचत असलेल्या तरुणाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. कच्ची घाटी येथे रविवारी रात्री ही घटना घडली. सचिन गोरखनाथ आरणे असे या मृत तरुणाचे नाव आहे. विहिरीत पडल्यानंतर डोक्याला मार लागल्याने बुडाला, असे चिकलठाणा पोलिसांनी सांगितले.

मुळ कोपरगाव आहमदनगर येथील सचिन आरणे हा शहरात चिकलठाणा येथे राहत होता. सचिन हा चिकलठाण्यात मेडिकल चालवायचा, तर सचिनची बहीण ही चिकलठाणा विमानतळावर केंद्रीय औदोगिक सुरक्षा दलात नोकरी करते. रविवारी कच्ची घाटी येथे त्याचा मित्र अर्जुन राजपूत याचे लग्न होते. लग्नाची वरात सुरु असताना नाचत असलेल्या सचिनला कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने तोल जाउन विहिरीत पडला.

हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सचिनला वाचवण्याचा प्रयत्न केला. सचिनच्या डोक्याला मार लागल्याने तो विहिरीत बुडाला होता. उपस्थितांनी लगेच पोलिसांना संपर्क केला. चिकलठाणा पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. चिकलठाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. विहिरीत पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो विहिरीत बुडाला असे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांंनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या