उभ्या दुचाकीवर मित्राशी गप्पा मारत असलेल्या तरुणाला पाठीमागून भरधाव दुचाकीस्वराची धडक

औरंगाबाद : दुचाकी उभी करुन मित्राशी गप्पा मारत असलेल्या तरुणाला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात समोरील दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन दुचाकी व मोबाइलचे नुकसान झाले. हा अपघात २६ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हर्सुल भागात घडला.

रोहित रमेश सोनवणे हा रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन मित्राशी गप्पा मारत होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकी (एमएच-२०-एएक्स-२०४४) स्वाराने त्याला धडक दिली. यात रोहित जखमी होऊन त्याच्या दुचाकी आणि मोबाइलचे नुकसान झाले. अपघात घडताच दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला.

त्यानंतर रोहितने दवाखान्यात उपचार घेतले. पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगत, याप्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हर्सूल पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या