हरवलेल्या मोबाईलची विचारणा करणाऱ्या तरुणाला टोळक्याची मारहाण

औरंगाबाद : हरवलेल्‍या मोबाइलबाबत विचारणा केल्‍याने तरुणाला लाकडी दांड, लोखंडी रॉड आणि हॉकी स्‍टीकने जबर मारहाण करुन जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणी अटक आरोपी जावेद खान अय्युब खान (३६, रा. नुतन कॉलनी) याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सोमवारी दि.१४ दिले.

विजय कॉलनी,अजब नगर मध्‍ये राहणारा सुयश रविंद्र शिरसाठ (२२) हा २ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्‍या सुमारास भाऊ संकेत, मीत्र स्‍वप्‍नील हर्षे आणि नितीन सदाशिवे यांच्‍या सोबत अजबर नगर येथील दुध डेअरीच्‍या कंम्‍पाउंड वॉल शेजारी लघू शंकेसाठी जात होते.

त्‍यावेळी चारचाकी वाहनातून उतरलेल्या जावेद खान याने हरविलेल्या मोबाइल बाबत माझ्याकडे विचारणा का केली म्हणत साथीदार सरफराज खान, सिंकदर खान व इतर तीघा चौघांच्‍या मदतीने सुयश शिरसाठ याला लाकडी दांडा, लोखंडी रॉड आणि हॉकीने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले तसेच जीवे मारण्‍याची धमकी देखील दिली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP