भय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक

bhayyu maharaj

इंदोर : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक पुराणिक नावाच्या तरुणीला कलम 306, 384 आणि 34 अंतर्गत अटक केली आहे.

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. पलकने प्रेम संबंध बनवून भैयू महराजांकडून लाखो रुपये लूटले होते. त्यांच्यावर लग्नासाठी तरुणी दबाव टाकत होती अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी भय्यूजी महाराज यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांनी असे टोकाचे पाउल उचलल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त केल जात होतं.

त्यांच्या रूममधून सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये त्यांनी ‘आपण आयुष्यातल्या ताणतणावाला कांटाळलो आहे, हे ताणतणाव आता सहन होत नसल्याच’ लिहिले आहे, तसेच आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असही त्यांनी या चिट्ठीत लिहीलं आहे.