उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन

solapur zp

सोलापूर/प्रतिनिधी  : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन करण्याचा प्रताप केला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे .

सांगोला तालुक्यातील चिक महूद गावची हि घटना असून ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी रात्री ८.३० वाजता मशाल फेरी काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. पहाटे ५ वाजता डॉ. भारुड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी  उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. शौचास निघालेल्या काही महिला आणि पुरुषांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. कहर म्हणजे एका महिलेच्या गळ्यात हार घालून फोटोसेशनही करण्यात आले.या प्रकाराबद्दल सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हे फोटो व्हायरल झाले तसेच हे फोटो माध्यमांनाही पाठवण्यात आले होते. यातील एक वादग्रस्त फोटो व्हायरल झाला. आता जिल्हा परिषदेवर सर्वच स्थरातून टीका होऊ लागली आहे.डॉ. राजेंद्र भारुड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना महिलेचा अशाप्रकारे फोटो व्हायरल होणे हा प्रकार चुकीचा आहे.आम्ही या प्रकरणाची माहिती तर घेऊच परंतु पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी घेऊ असं म्हटलंय