प्रसुतीकळा सोसणाऱ्या महिलेचा सहा किलोमीटर खाटेवर प्रवास..

blank

टीम महाराष्ट्र देशा : प्रसुतीकळा सोसत एका महिलेला ग्रामस्थांनी खाटेसकट उचलून सहा किलोमीटर चालत नेले. मग गाडी करून हॉस्पिटलकडे… कारण रस्ता तयार नव्हता. चिखलात पाय रुतणाऱ्या या वाटेवर गाडी चालणं शक्यच नाही. हिंगोलीतल्या कळमनुरी तालुक्यातल्या करवाडी गावातली ही कालचीच घटना.

पण ही पहिली घटना नाही. दोन वर्षांपूर्वीही असंच घडलं होतं. १९ सप्टेंबर २०१७ रोजी एका गर्भवती महिलेला खाटेवरून चालत रुग्णालयात आणावं लागलं होतं. त्यावेळीही राज्य सरकारने दखल घेतली नाही. अखेरीस न्यायालयाने सुओ मोटो याचिका दाखल करून राज्य सरकारला जाब विचारला. पण सरकारला या रस्त्याकडे लक्ष द्यायला काही वेळ मिळाला नाही.

दरम्यान सुनावणीच्या तारखा दोन वर्षे उलटत राहिल्या. पण रस्ता काही झाला नाही. ५ जुलै २०१९ रोजी झालेल्या सुनावणीत शासनाने दिलेल्या उत्तरात गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी एक कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले आणि हा रस्ता २०२० पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन दिलं. आणि आता जुलै महिन्याच्या अखेरीस पुन्हा तशीच घटना घडली. आता रस्ता होईपर्यंत करवाडीतल्या महिलांनी मुलांना जन्म देऊ नये, असा फतवा सरकारने काढला नाही म्हणजे मिळवलं अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

बाहुबली सिनेमाचा सेट वाटावा एवढं सुंदर स्थळ तुम्हाला ठाऊक आहे का ?

काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे : रावसाहेब दानवे

मनुष्य जीवनाची किंमत नसलेले लोकं सत्तेवर : जितेंद्र आव्हाड