fbpx

एका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न  

mantralay

मुंबई : विविध समस्यांमुळे त्रस्त होत जीवन संपवण्यासाठी मंत्रालयाची पायरी चढण्याच्या घटनांत गंभीर वाढ होत आहे.  आज दुपारी पुन्हा एका महिलेने सावकारी कर्जाला कंटाळून मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

चेंबूर येथील रहिवासी असणाऱ्या  शारदा अरुण कांबळे (४५) या आपल्या सोबत रॉकेलची बाटली घेऊन आल्या, व त्या मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्याचवेळी प्रवेशद्वारावर सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करीत आहेत.