…. ‘म्हणून’ सोमालियात महिलेला दगडाने ठेचून मारले

सोमालियात – सोमालियात एका महिलेला दगडांनी ठेचून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुकरी अब्दुल्लाही वारसेम असं या महिलेचं नाव आहे.

दहशतवादी संघटना अल-शबाबने या महिलेला एकापेक्षा जास्त पती असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं. या महिलेवर तलाक न घेता ११ लग्न केल्याचा आरोप होता. महिलेला आधी मानेपर्यंत जमिनीत गाढण्यात आलं, यानंतर अल-शबाबकडून तिच्यावर दगडफेक करत ठार करण्यात आलं. अल-शबाब ही संघटना शरिया कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करत असते.

या दहशतवादी संघटनेचं सोमालियाच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे. अल-शबाबच्या स्वयंघोषित न्यायाधीशाने महिलेने आपण गुप्तपणे ११ लग्नं केल्याची कबुली दिल्याचं म्हंटल आहे.“शकुरी अब्दुल्लाही आणि तिच्या नऊ पतींना ज्यामध्ये तिच्या कायदेशीर पतीचाही समावेश होता, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रत्येकजण ही आपली पत्नी असल्याचं सांगत होतं”, अशी माहिती शब्बाबचे गव्हर्नर मोहम्मद अबू उसामा याने दिली आहे.

इस्लाममध्ये महिलेने एकाहून जास्त लग्न करणं बेकादेशीर आहे. मात्र पुरुषांना चार लग्नं करण्याची परवानगी आहे. पती आणि पत्नी दोघांसाठी घटस्फोटाची सुविधा आहे, मात्र पुरुष स्वत:हून वेगळा होऊ शकतो तर महिलेला पतीची परवानगी घेणं आवश्यक असतं. जर पतीने नकार दिला तर तिला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते.