एका महिलेने वाघाची शेळी केली, भाजप नेत्याचा घणाघात

uddhav takary

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे अत्यंत चुकीचे आहे. पण कंगना राणावतचा संबंध भाजपशी जोडून पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याबद्दल अपशब्द काढले जात आहेत. या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द काढले जात असताना त्यावेळी तुम्ही कोणत्या बिळात लपून बसले होते, असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड.अभय आगरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच एका महिलेने वाघाची शेळी केली असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला आहे.

राज्यात सध्या कंगना प्रकरणावरून राळ उठी आहे. एका महिलेशी आपली वागणूक किती खालच्या पातळीवर घसरू शकते हे शिवसेनेने दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा राज्यासाठी निश्चित महत्त्वाची आहे हे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरले जात होते, त्यावेळी संस्कृती कुठे गेली होती.

त्यांच्याबद्दल अपशब्द ऐकून टाळ्या पिटणारे आज मात्र राज्याच्या अस्मितेबाबत गळा काढत आहे.असे आगरकर म्हणाले. एका महिलेशी लढण्यासाठी सरकारला मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा वापरावी लागणे हे दुर्दैवी आहे. वाघ म्हणून घेणाऱ्यांची एका महिलेपुढे शेळी झाल्याचे देशाने पाहिले आहे. कंगना राणावतचे नाव स्वच्छतागृहाला देऊन शिवसैनिकांनी आपली वागणूक किती खालच्या पातळीवर घसरू शकते हे दाखविले आहे, असे आगरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-