नगर-मनमाड महामार्गासाठी आ.विखे उतरणार रस्त्यावर

vikhe

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले असून सध्या नगर-मनमाड या मार्गाची अवस्था अतिशय भीषण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या झालेल्या नगर-मनमाड रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात आ.विखे यांनी सांगितले की, नगर-मनमाड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहतूक या मार्गावर सुरू असते. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून या खड्ड्याकडे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून आ.विखे यांनी रस्त्यातील खड्डे, वाहतुकीची अडचण या बाबी फोटो आणि शूटिंगच्या माध्यमातून एका सीडीद्वारे मंत्री अशोक चव्हाण यांना पाठवली आहे, असे विखे म्हणाले.

नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी आपण विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र दिले आहे. पण रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही हे दुर्दैव आहे. प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आता कोणत्याही क्षणी पूर्वसूचना न देता नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आ.विखे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :