Video- मद्यपी पोलिसाने काढली मुलींची छेड ; मुलींनी घडवली चांगलीच अद्दल

टीम महाराष्ट्र देशा- मुलींची छेड काढणाऱ्या मद्यपी पोलिसाला मुलींने आणि इतर लोकांनी चप्पलेचा मार दिल्याची घटना हरयाणामध्ये घडली. हरयाणामधल्या हिस्सार भागात ही घटना घडली असून संबधित पोलिसाला मारहाण करण्यात आल्याच इतर पोलिसांनीही कबुल केलं आहे. हा पोलीस कामावर दारू पिऊन आला होता. मद्याच्या प्रभावाखाली या पोलिसानं रस्त्यावरील मुलीची छेड काढली.

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार संबधीत पोलिसाचं नाव योगेश कुमार असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांने मद्यप्राशन करून छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोकांचा आक्रोश पाहता या पोलिसाला शेवटी माफी मागावी लागली. पोलिसांनी महिलेची छेड काढल्याची ही घटना दुर्दैवी असून या पोलिसावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिले.

पहा कशी केली मुलींनी मद्यपी पोलिसाची धुलाई