एक अनोखी संक्रांत! विधवांनी उत्साहात साजरा केला संक्रातीचा सण

बीड : संक्रातच्या दिवशी सौभाग्यवती महिला या वाण लूटून सण साजरा करतात. बीडमध्ये विधवा महिलांनी एकत्र येत थाटात संक्रांत सणादिवशी वाण लुटण्याचा कार्यक्रम करतात. वैधव्यावर मात करत बीडच्या आधुनिक सावित्रींनी रूढी परंपरेचे बंधने झुगारले. वैधव्य आलेल्या महिलांनी संक्रांतीच्या मोठ्या थाटात साजरा केला. विधवांना मिळणारी वागणूक ही अपमानची असते. अनेक ठिकाणी हेटाळणीच्या नजरेतून पाहिले जाते तर काही ठिकाणी अपशकूनी समजले जाते. अशा बुरसटलेल्या विचारांना छेद देण्याचे धाडस बीडच्या शिक्षिका मनिषा जायभाये यांनी केले आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील चुंबळी येथे विधवा 121 महिलांनी एकत्र येत मकर संक्रातीचे वाण लुटले. विशेषत: साडीचोळी भेट आणि तिळगुळ देत संक्रांत साजरी केली. या कार्यक्रमात चुंबळी गावांतील सहभागी महिलांच्या डोळ्यांमध्ये आश्रू तरळत होते. जोडीदार सोडून गेल्याचं दुःख होतेच तर चेहऱ्यावर एक सन्मान मिळाल्याचा आनंद पण होता. अनेक महिला कित्येक वर्षानंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

अपघाताने आमच्या वाट्याला आलेल्या या विधवापणामुळे आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात देखील सहभागी होण्याचा अधिकार दिला जात नाही. यामुळे आमची प्रचंड प्रमाणात घुसमट होते. अशा उपक्रमामधून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाल्याचा प्रत्यय येतो अशा भावना यानिमित्त महिलांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या