उसाच्या उभ्या ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. माजलगाव येथील गेवराई रोडवर केसापुरी कँम्पजवळ उसाने भरलेल्या उभ्या ट्रॉलीला दुचाकीने जोरात धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनूसार, रविराज शेंडगे आणि विवेक मायकर व अन्य एकजण रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून माजलगाव वरून केसापुरी कॅम्पकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला मोटार सायकलची जोराची धडक झाली.

यात रविराज रामहरी शेंडगे (वय २०, रा.उमरी), विवेक भागवत मायकर (वय २१, पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिसरा ओंकार काळे हा तरुण जखमी झाला. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरुयेत. या घटनेने माजलगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या