एका ट्विट ने तो सौदीतून घरी पोहचला सुरक्षित .

sushma-swaraj

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या परदेशातील भारतीयांना तत्पर मदत देण्यासाठी नेहमीच तयार असतात,पुन्हा एकदा अशाच एका परदेशात अडकलेल्या भारतीयाला सुषमा यांनी तक्रार केल्यानंतर एका दिवसाच्या आत मदत केली .

त्रिपुरा येथील गोपाळदास दोन वर्षापूर्वी नोकरी निमित्त सौदी अरेबियामध्ये गेले होते.पण गेल्या सहा महिन्यापासून त्यांना पगार दिला गेला नाही.या करता गोपालदास यांनी त्यांच्या मालकाकडे विचारणा केली असता त्यांना उलटसुलट उत्तरे देण्यात आली.या बरोबरच त्यांची पिळवणूक देखील करण्यात आली.दोन आठवड्यापूर्वी त्यांना कामावरून काढण्यात आले.कामावरून काढल्यामुळे गोपालदास यांची अवस्था अत्यंत बिकट झाली.त्यांनी भारतात असलेल्या त्यांच्या पत्नीला सर्व परिस्थिती सांगितली व मदतीचे आव्हान केले.

गोपालदास यांच्या पत्नीने भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या मदतीने गोपालदास यांचा एक व्हिडिओ परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व नरेंद्र मोदींना ट्विट केला .सुषमा स्वराज यांचे ट्विटर अकांउट हे जगभरातील भारतीय दूतवासाशी जोडलेलेअसल्याने यांचाच संदर्भ घेत  रियाधमधील भारतीय दूतावासाने  ट्विटला उत्तर दिले आणि दासच्या फोन नंबरसाठी त्याला विचारले. व्हिडिओची  पडताळणी केल्यानंतर दूतावासाला दासशी संपर्क साधून त्यांची  सुटका करण्यात आली.