Share

Breaking News। नाशिकमध्ये अजून एक दुर्घटना; गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

नाशिक : सकाळीच नाशिक येथे अतिशय थरारक अशी घटना घडली. प्रायव्हेट बसमधून प्रवास करणारे प्रवासी गाढ झोपेत असतानाच पहाटे काळाचा घाला आला. नाशिक येथील मिरची चौक येथे एका प्रायव्हेट लक्झरी बसचा टँकर सोबत भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला आणि क्षणात या बसची राख झाली. या घटनेनं संपुर्ण शहर हादरलं आहे. या अपघातातील मृत्यूची संख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेला काही तास उलटले नाहीत तोच अशीच एक हृदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.

शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर घडली आहे.

ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावरच रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅस ने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे घटनास्थळी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

नाशिक : सकाळीच नाशिक येथे अतिशय थरारक अशी घटना घडली. प्रायव्हेट बसमधून प्रवास करणारे प्रवासी गाढ झोपेत असतानाच पहाटे काळाचा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Travel

Join WhatsApp

Join Now