महेंद्रसिंह धोनीच्या घराची सैर, पत्नी साक्षीच्या नजरेतुन

धोनी

रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा देशातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल स्थगिती नंतर धोनी सध्या त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर माहीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धोनीबद्दल अपडेट देताना दिसते. नुकताच साक्षीने धोनीच्या सुंदर फार्म हाऊसचा फोटो शेअर केला आहे.

साक्षीने व्हिडिओद्वारे फार्म हाऊसचा दौरा केला आहे. साक्षीने सोमवारी हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नेटकरी धोनीच्या फार्म हाऊसचे कौतुक करीत आहेत. या व्हिडीओवर बऱ्याच बऱ्याच कमेंट्स देखील केल्या आहेत. त्याचवेळी काही लोकांना धोनी बघायचे आहे. काहींनी कमेंट करत लिहिले, ‘कृपया माही भाई दाखवा.’

धोनीच्या फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल ते इनडोअर स्टेडियम आणि जिमसारख्या सुविधा आहेत. टीम इंडियाचे जवळपास सर्वच क्रिकेटर्स या फार्म हाऊसमध्ये आले आहेत आणि त्याचा आनंद लुटला आहे. धोनीच्या फार्म हाऊसच्या लॉनमध्ये त्याचे आवडते पाळीव प्राणी दिसतात. धोनी येथे आपल्या पाळीव प्राण्यांना प्रशिक्षण देतो. आपल्या पाळीव प्राण्यांना प्रशिक्षण देताना त्याने अनेक वेळा व्हिडिओही शेअर केले आहेत.

या फार्म हाऊसमध्ये ग्रीनरी सर्वत्र दिसत आहे. फार्म हाऊसमध्ये निरनिराळ्या प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्येही पार्किंग आहे, तेथे त्याच्याकडे त्यांच्या आवडीच्या कार आणि बाईकचा संग्रह आहे. फार्म हाऊसमध्ये एक बंगला देखील आहे, जो 7 सात एकरात पसरलेला आहे. यात धोनी आणि साक्षीच्या बेडरूमची आधुनिक पद्धतीने रचना केली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP