देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

e veichel

नवी दिल्ली- देशात इलेक्ट्रिक/हायब्रीड वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया अर्थात फास्टर ऍडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड ऍन्ड इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची एक एप्रिल 2019 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू आहे आणि त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या टप्प्यात सार्वजनिक आणि शेअर पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण आणि 7090 ई-बसेस, 5 लाख ई- तिचाकी, 55,000 ई- चारचाकी प्रवासी वाहने आणि 10 लाख ई- दुचाकी यांना अनुदानाचे पाठबळ देण्यावर भर दिला जात आहे. ई- दुचाकी, ई- तिचाकी आणि ई- चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या 38 ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सची (ओईएम) फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 9 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी झाली आहे.

या वाहनांचे उत्पादक/मूळ सामग्री उत्पादक यांचे तपशील सोबतच्या तक्त्यात दिले आहेत.अवजड उद्योग राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणखी वाढू शकतो अशी शक्यता दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या