पुणे : पुणे शहरात आज नव्याने ३४६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८४ हजार ७०२ इतकी झाली आहे. शहरातील २८७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार १२६ झाली आहे.
पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ६९७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ८ हजार ८८४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ८६७ रुग्णांपैकी २२७ रुग्ण गंभीर तर ३८७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
तर राज्यात आज ८ हजार १५९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जालना, परभणी, हिंगोली, लातूरसह नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’
- ‘१२ आमदारांच्या नियुक्त्या का केल्या नाहीत?’, हायकोर्टाच्या प्रश्नांमुळे राज्यपालांची कोंडी
- ‘या’ कारणामुळे मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचा खुलासा
- ओबीसी आरक्षणात मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार हेच झारीतील शुक्राचार्य-चंद्रशेखर बावनकुळे
- सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा खरचं पचणी पडणारा आहे का?