एक असा ठग ज्याने विकला लाल किल्ला ,ताजमहल आणि राष्ट्रपती भवन 

वेब टीम ; एखाद्या व्यक्तीने जर कुणाची फसवणूक केली त्या व्यक्तीला नटवर लाल म्हणून संबोधण्यात येत, कोण हा नटवर लाल,कोणाला त्याने फसवलं एवढा कुप्रसिद्ध असणारा हा इसम कोण  याबद्दल फारशी माहिती नसताना देखील आपल्या तोंडून अजाणतेपणे हे नाव उच्चारले जाते . आज आपण याच नटवर लाल बद्दल जाणून घेणार आहोत .तो सामान्य ठग नव्हता . निर्भीडपणे सर्वत्र वावर आणि अनोख्या संवादशैलीमुळे बरेचं लोक त्याच्याकडून फसवले गेले.

मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ  नटवर लाल हा भारताच्या इतिहासात सर्वात मोठा ठग म्हणून ओळखला जातो . त्याचा जन्म बिहारच्या सीवान जिल्ह्यातील जीरादेई या गावामध्ये झाला होता . लग्नानंतर अवघ्या काही वर्षातच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता शिवाय त्याला मुलबाळ देखील नव्हत. त्याने वकिलीचे देखील शिक्षण घेतले होते असं देखील सांगितलं जात.तो मोडकी तोडकी इंग्रजी देखील बोलू शकत होता. त्याने काही काळ पटवाऱ्याची देखील नोकरी केली मात्र त्याचं मन नोकरीमध्ये रमत नसे . त्याला लोकांना फसवण्यात विलक्षण आनंद मिळत असे.नटवर लाल ने तीन वेळा ताजमहल ,दोन वेळा लाल किल्ला तर एकदा चक्क राष्ट्रपती भवनच विकले होते यावरून तो छोटा-मोठा ठग नव्हता हे लक्षात येत .

Loading...

natwarlal

नटवर लाल नकली हस्ताक्षर करण्यात पटाईत होता. एकदा पाहिलेली सही तो मोठ्या सफाईदार पद्धतीने करून लोकांना दाखवत असे . एकदा भारताचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद त्यांच्या गावी आले असता  प्रसाद यांची सही त्याने त्यांच्या समक्ष अगदी हुबेहूब करून दाखवली . दस्तुरखुद्द राजेंद्र प्रसाद देखील आश्चर्यचकित झाले होते . पुढे याच कलेचा वापर करून त्याने शेजाऱ्याच्या चेकवर नकली सही करून १००० रुपये बँकेतून काढले आणि अशा रीतीने ठगगिरीला सुरुवात झाली . यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि अशा शेकडो लोकांची फसवणूक त्याने आयुष्यभर केली .

The Red Fort1

नटवर लाल बद्दल जे किस्से सांगितले जातात त्यामध्ये  तीन वेळा ताजमहल ,दोन वेळा लाल किल्ला तर एकदा  राष्ट्रपती भवनच विकले याची सर्वात जास्त चर्चा केली जाते. डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या सहीची नक्कल करून त्याने या इमारती विकल्या होत्या . त्याने सर्वात जास्त सरकारी कर्मचारी आणि मध्यमवर्गीय लोकांना फसवले . बिहार,मध्य प्रदेश,दिल्ली हरियाणाया राज्यात शेकडो केसेस दाखल झाल्या होत्या . त्याच्या आयुष्यात त्याला ९ वेळा पोलिसांना पकडण्यात यश आलं मात्र तो फक्त ११ वर्षे जेल मध्ये राहिला तर ३० केसेस मध्ये पुराव्याभावी निर्दोष सुटला .

natwarlal-3

नटवर लाल स्वतः ला रॉबिन हूड मानत असे . त्याने केलेल्या लोकांच्या फसवणुकीचा  त्याला कधीही पश्चाताप झाला नाही . तो म्हणत असे की मी कोणतीही हिंसा केली नाही ,तसेच कोणत्याही हत्याराचा वापर देखील केला नाही मी फक्त लोकांना वेगवेगळी कारण सांगून पैसे मागितले आणि लोकांनी ते स्वतः दिले त्यामुळे त्यात गैर ते काय असा सवाल तो नेहमी विचारत असे.

त्याने स्वतःची वेगवेगळी अशी तब्बल ५६ नावे ठेवली होती परंतु सर्वात जास्त त्याच नटवर लाल हेच नाव लोकांना माहित होत . नटवर ला शेवटच दरभंगा स्टेशनवर पाहिलं गेलं होत . एका पोलीस शिपायानेच त्याला ओळखलं होत जो त्याला लहानपणापासून ओळखत होता . मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्या आधीच नटवर पळून गेला त्यानंतर तो पुन्हा कधीही दिसला नाही . २००४ मध्ये पुन्हा एकदा नटवर लाल हे नाव चर्चेत आलं . एका वकिलाने नटवर लाल चं मृत्युपत्र त्याच्याकडे दिल्याचा दावा केला मात्र त्याच्या नातेवाईकांच्या मतानुसार त्याचा मृत्य १९९६सालीच झाल्याचा दावा केला होता असं असलं तरीही नटवर लालच्या मृत्यू बाबत कोणतीही ठोस माहिती आज उपलब्ध नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले