महाराष्ट्रातही ‘दिशा’च्या हालचालींना वेग,तीन सदस्यीय समिती मसुदा सादर करणार

मुंबई : हिंगणघाट घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गुरूवारी (ता. 20) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्र प्रदेशमध्ये गेले होते. आता या शिष्टमंडळाने या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

यावरून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारच्या हालचालींना वेग आला असल्यचे दिसत आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत केली असून, ही कमिटी 10 दिवसात कायद्याचा मसुदा सादर करणार आहे. यामुळे, लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात येण्यास मदत होणार आहे, असे ट्विट करत सतेज पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिलीआहे.

Loading...

 

या सदस्यीय समितीत अस्वती दोरजे, संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी(MPA)यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. अस्वती यांच्यासोबत नियती ठाकेर दवे, पोलीस उपआयुक्त,(परिमंडळ-5, मुंबई), व्यं. मा. भट, उप सचिव गृहविभाग,(मंत्रालय, मुंबई)या व्यतिरिक्त आवश्यकता असल्यास नागरी समाजातील आणि कायदेशीर क्षेत्रातील तज्ञ सदस्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या कायद्यासंदर्भात आपणही आपल्या सूचना या [email protected] ला पाठवाव्यात, असं आवाहन देखील गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश