कोकणातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा फडणवीसांच्या उपस्थित ‘भाजपा’त प्रवेश

Gulabrav chavhan

सिंधुदुर्ग: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व व शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या गुलाबराव चव्हाण यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ताकदीला आता सुरंग लागल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा खासदार नारायण राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालकपद असलेल्या चव्हाणांनी केलेल्या या भाजपा प्रवेशामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

दरम्यान, याप्रवेशावेळी नारायण राणे यांच्यासह पुत्र आणि आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड ही भाजपची नेते मंडळीही उपस्थित होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आदर्श मानणारे गुलाबराव चव्हाण, हे पवारांचे कट्टर समर्थक समजले जात होते. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत आहेत.

‘राहुल गांधी यांना कॉंग्रेस अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर पक्षाने नवीन अध्यक्ष करावा’

तर, राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे.विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

IPL स्पॉन्सरशिपसाठी पतंजलीही शर्यतीत उतरणार ?