Share

Bhagatsingh Koshyari | “आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षाही जलदगतीने विचार येतात”

Bhagatsingh Koshyari | मुंबई :  आपल्याला माहित आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्याना-कोणत्या मुद्यावरून चर्चेत असात. त्यात अनेकदा ते त्यांच्या बोलण्यामुळे जास्त चर्चेत असतात. अशातच भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संदर्भात एक विधान केलं आहे. आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षाही जलदगतीने विचार येतात, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari)

आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपण सर्वजण विश्वासावर चालतो. आपण जे काम करतोय ते किती कौशल्यपूर्ण करतोय, त्याला योगा म्हणतात. भगतसिंह कोश्यारी यांनी आज (बुधवार) एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मला असं वाटतं आपले पंतप्रधान हे स्वत: योगी आहेत, ते योगाचा अभ्यास करतात. आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षा थोडे जास्तच जलदगतीने विचार येतात. त्यांनी पंतप्रधान झाल्याच्या वर्षभराच्या आतच कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले. ही एक मोठी गोष्ट आहे. इतक्या वर्षांमध्ये कोणीच विचार केला नाही आणि त्यांनी हा विषय हाती घेतला. कारण, आपण सर्वजण विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांचे शिक्षण घेतो. परंतु आपण रोजगार कसा मिळवू शकतो, आपण कशाप्रकारे रोजगार देऊ शकतो. यासाठी त्यांनी प्रयत्न केला की देशात अधिक प्रमाणात कौशल्य विकासाला चालना मिळेल, असंही भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर काय काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bhagatsingh Koshyari | मुंबई :  आपल्याला माहित आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्याना-कोणत्या मुद्यावरून चर्चेत असात. त्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now