Share

Congress | “भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, म्हणून…”, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं विधान

Congress | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) पक्षाची सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेमुळे (Bharat Jodo Yatra) भाजप (BJP) पक्षात भीतीचं वातावरण असल्याचा दावा, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केलं आहे. ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो यात्रे’ची सुरूवात केली आहे. या प्रवासाला ६५ दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला आहे.

काँग्रेसच्या या यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं मला वाटतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी भेट देत आहेत. अर्थात या दौऱ्यात विविध प्रकारचे फोटो ऑप्शन्स असतील. पण लोकांसोबत चालणे आणि त्यांचे ऐकणे यातून निर्माण झालेल्या नात्याशी कोणताही कृती जुळू शकत नाही, जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

तसेच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला केवळ काँग्रेस समर्थकांचाच किंवा कार्यकर्त्यांचाच पाठिंबा मिळत नाही, तर पक्षाचे टीकाकारही या यात्रेत सामील झाले आहेत. त्यांनाही भारत जोडो यात्रा काय आहे, राहुल गांधी काय करतायत आणि ही का सुरू केली हे जाणून घ्यायचे आहे, असंहे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून हा प्रवास हिंगोली येथे पोहोचला आहे. नांदेडमध्ये एक जबरदस्त रॅली निघाली. याठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सामील झाले, असं जयराम रमेश म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Congress | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) पक्षाची सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेमुळे (Bharat Jodo …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now