औरंगाबादेत अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन बैठक

औरंगाबाद : जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चे नियोजन करण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) नियोजन मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा अंतिम होईल. बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री नवाब मलिक, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांच्यासह विधिमंडळ सदस्य, खासदार, सीईओ, महापालिका आयुक्त उपस्थित राहतील.

महापालिका मागणार 75 कोटींचा निधी

Loading...

नियोजन समितीची गुरुवारी (ता.३०) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महापालिकेतर्फे तब्बल ७५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

महापौरांनी सांगितले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिकेकडूनही निधीची मागणी केली जाणार आहे. त्यात राज्य शासनाच्या शहर सडक योजनेअंतर्गत ५० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतूनही शहरातील कामांसाठी १० कोटी, तसेच शहर विकास आराखड्यानुसार रस्त्यांच्या रुंदीकरणात बाधित होणारे विद्युत पोल व रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी १५ कोटींचा निधी देण्याची मागणी केली जाणार आहे.

हेही पहा – 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...