क्रिकेटच्या देवाला चिमुकल्या फॅनचं खास पत्र

टीम महाराष्ट्र देशा : सचिन तेंडूलकर…अर्थात क्रिकेटचा देव. सचिनचे चाहते फक्त भारतातच न्हवे तर पूर्ण जगामध्ये आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत सचिन वर जीवापाड प्रेम करतात. अश्यातच एका चिमुरड्याने सचिनला एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अरमान असे या चिमुरड्या फॅनचे नाव आहे. सचिनसारखंच आपल्यालाही व्हायचं असल्याचे अरमानने म्हटले आहे. अरमानने स्वःताच्या हस्ताक्षरात हे पत्र लिहिले. सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करत, अरमानचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिनने शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने अरमानचे मानले आभार

काय लिहील आहे या खास पत्रात

“डिअर अंकल सचिन, मी तुझा सिनेमा (सचिन : अ बिलिअन ड्रीम्स) पाहिला आणि मी खूप एन्जॉय केला. मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. मला तुझ्यासारखं खेळून देशासाठी चषक जिंकायचं आहे. तुझी स्वाक्षरी असलेली बॅट मला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. तू दिलेलं बक्षीस माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आहे.”Loading…
Loading...