नम्रताला जॉनी लिव्हरने दिली खास भेट; पोस्ट शेअर करत केली भावना व्यक्त

जॉनी लिव्हर

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या शो मधील सर्वच कलाकार आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातील सर्वच कलाकारांनी अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून ‘रविवारची हास्यजत्रा’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शो दरम्यान कॉमेडीचे किंग जॉनी लिव्हर यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, यावेळी जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं आणि त्या पात्रासाठी त्यांनी नम्रताचं कौतुकही केलं. तसेच इतर कलाकारांचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. जॉनी लिव्हर यांनी यावेळी नम्रताला एक खास भेटवस्तू दिली. या खास क्षणाचा फोटो आणि त्याबद्दलच्या भावना इन्स्टाग्रामवर नम्रताने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत.

सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत नम्रताने लिहिले की, ‘जेव्हा विनोदाचा बापमाणूस जॉनी लिव्हरजी तुमचं काम बघून सरप्राइज गिफ्ट घेऊन येतात तो तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. आपण प्रामाणिकपणे काम करत असतो धडपडत असतो, शून्यापासून सुरुवात केली अगदी ज्युनिअर आर्टिस्ट पासून ते पासिंगच्या रोलपर्यंत. आज सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रापर्यंतचा प्रवास सुरू आहे आणि तो सुरुच राहील. पण जेव्हा त्यात आशीर्वादाची भर पडते तेव्हा अजून हुरूप येतो उत्साह वाढतो.’

पुढे ती म्हणाली, ‘प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच पण जेव्हा आपल्या क्षेत्रातल्या नामवंत कलावंतांचा फोन येतो त्यात विनोदाच्या बाप माणसाचा फोन येतो आणि ते आपल्या कामाचं भरभरून कौतुक करतात, तेव्हा आनंदाला पारावार उरत नाही. तो ओसंडून वाहतच राहतो, असंही कधी घडू शकतं याची कल्पनाच कधी केली नव्हती. सगळं स्वप्नात आहे. कौतुक आणि प्रेम या व्यतिरिक्त काय हवं असतं एका कलाकाराला.’ असे म्हणते नम्रताने तिचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच शेवटी तिने जॉनी लिव्हर, सोनी मराठी आणि सह कलाकरांचे देखील आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP