त्याने तब्बल सतरा किलोमीटर केला दुचाकीवरून ‘सापा’ सोबत प्रवास; आणि घडल अस की. . .

नंदुरबार: मोकळ्या मैदानात आपण साप पाहिला तर आपली पाळताभुई होते. मग एखादा साप तुमच्या दुचाकीतुनच निघाला तर. नक्कीच पाळण्यासाठी आपल्याला मैदान कमी पडेल. मात्र प्रत्यक्षात एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुम्ही नक्कीच यापुढे दुचाकी सुरु करण्याच्या आधी ती एकदा तरी तपासून पहाल.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने दुचाकीस्वार शेतक-यासह परिसरातील नागरिकांची धांदल उडाल्याच पाह्यला मिळाल आहे. शहरातील हितेश अशोक पाटील (२५) यांची लोहारा शिवारात शेती आहे. दिवसभर शेतातील कामे आटोपून चार वाजता ते दुचाकीने घराकडे यायला निघाले. १७ किलोमीटरचा प्रवास करून हितेश पाटील हे शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ आले असता उजव्या पायावर काही तरी चढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली वाकून पाहिले तर सापाचे तोंड दिसताच त्यांनी भेदरलेल्या अवस्थेत दुचाकी सोडून तेथून पळ काढला.

येणा-या-जाणा-यांनी विचारणा केली असता त्यांनी दुचाकीत साप असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्पमित्रांना बोलवून हा साप काढण्यात आला. हा धूळनाग असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्याला पकडून सर्पमित्रांनी जंगलात सोडले.