पुण्यातील प्रसिद्ध एसपीज बिर्याणी मध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकाच्या बिर्याणीत अळ्या

पुणे: तुम्ही जर एखाद्या खाद्यपदार्थाचे चाहते असाल आणि अशाच पदार्थामध्ये आळ्या निघाल्या तर काय होईल, नक्कीच आपण तो पदार्थ खाण्याचे सोडूनच देऊ. आज पुण्यातील सुप्रसिद्ध ‘एसपी’ बिर्याणीमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे, एसपीजमध्ये खात असताना ग्राहकाच्या ताटातील बिर्याणीमध्ये चक्क आळ्या आढळून आल्या आहेत.

बिर्याणीसह नॉनव्हेज खाद्यपदार्थांसाठी टिळक रोडवरील एसपीज बिर्याणी रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे. पुण्यात राहणारे वीरेंद्र ठाकूर हे आपल्या मुलासह एसपीजमध्ये खाण्यासाठी गेले होते, यावेळी ठाकूर यांना बिर्याणी खात असताना ताटात अळ्या असल्याचे दिसले. हा धक्कादायक प्रकार त्यांनी वेटर आणि मॅनेजरला सांगितला, यावेळी मॅनेजरने आपली चूक मान्य केली मात्र लगेच ठाकूर यांच्याशी अरेरावी करत दमबाजी केली.

दरम्यान, एसपीज बिर्याणी सारख्या सुप्रीसद्ध रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारावर एफडीए काय कारवाई करणार हे पहावं लागणार आहे.