न्यूझीलंड संघाच्या मनात भरली धडकी ; पहा भारतीय खेळाडूंचा नेट सरावाचा व्हिडीओ

न्यूझीलंड

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाला लंडनमध्ये पोहचल्यानंतर ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागले. टीम इंडियाने मुख्य मैदानात आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली.

लंडनमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गुरुवारी नेट सरावाला सुरूवात केली. बीसीसीआयनं खेळाडूंच्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ  बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत टीम इंडियाची जय्यत तयारी सुरु आहे. टीम इंडिया आत न्यूझीलंड संघाला हरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारतीय संघ – विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू – अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

महत्त्वाच्या बातम्या

IMP