मुंडेंवरील आरोपांवर शिवसेनेच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया…

uddhav thakre and dhananjay munde

गोंदिया : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. तर, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर प्रश्न केला असता बोलणं टाळलं आहे. शिंदे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे शिवसेना मेळाव्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुंडेंबाबत प्रश्न केला असता केवळ ‘नो कमेंट्स’ असं उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या