राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २० एनसीसी कॅडेट्सची निवड

नवी दिल्ली : या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्यापथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 20 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.

येथील छावनी परिसरातील डिजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु यांच्या हस्ते आज या शिबिराचे उद्घाटन झाले. देशभरातील 17 एनसीसी संचालनालयाचे 2000 कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाच्या समजण्यात येणाऱ्या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 144 एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत पैकी महाराष्ट्रातील 20कॅडेट्सची निवड झाली आहे.

राज्यातील 111 एनसीसी कॅडेट्स 1 जानेवारी पासून या शिबिरात दाखल झाले आहेत. यात 74 मुले तर 37 मुली आहेत. त्यातील 16 कॅडेट्स हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरीत 95 कॅडेट्स हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील 10 मुले आणि 10 मुली अशा एकूण 20 कॅडेसची प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्यापथसंचलनासाठी निवड झाली आहे. 28 जानेवारीला होणाऱ्या ‘पंतप्रधान रॅली’मध्ये मानवंदना देण्यासाठी 50 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. राष्ट्रपती,पंतप्रधान आदी गणमान्य व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी 9 कॅडेट्सची निवड झाली आहे.

You might also like
Comments
Loading...