धोनीच्या फार्म हाऊसवरील अनोखं मैत्रीचं दृश्य ; पाहा व्हिडीओ

धोनी

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा सत्र पुढे ढकलल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी रांचीमध्ये कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे, त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेत येत आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापर्यंत पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर होता. अनेक संघांमध्ये कोरोनाची झाल्यानंतर आयपीएल -14 चा पहिला टप्पा 4 मे रोजी निलंबित करण्यात आला होता. आता हे युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजित केले जाईल.

महेंद्र सिंग धोनी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो मात्र त्याची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते ती नेहमी धोनी आणि जीव बद्दल उपडेट देत असते. ती नेहमीच धोनी आणि जीवाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच साक्षीनं इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे घोडा आणि कुत्रा यांची शर्यत लागली आहे. याआधी धोनीने चेतक नावाचा घोडा विकत घेतला होता. धोनीची पत्नी साक्षीने या घोड्याचा व्हिडिओ शेयर केला आणि तो कुटुंबाचा एक सदस्य असल्याचं सांगितलं. तसंच तिने धोनी घोड्याला मसाज करत असल्याचा फोटोही साक्षीने शेयर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP