मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागाचा आढावा

मुंबई : दुष्काळग्रस्त भागात कृषीपंप वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. यासाठी ११०५ कोटीचा प्रस्ताव विचाराधीन होता. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषीपंप वीज जोडणी आवश्यक आहे. यासाठी महावितरण कंपनीने पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर द्यावा . दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी दोन लाख आठ हजार कृषीपंप पैसे भरून प्रलंबित आहेत. या प्रलंबित कृषी पंपाच्या उर्जीकरणासाठी महावितरणने निधी उभारण्याची सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.. केंद्र पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील रस्ता पुनर्स्थापनाचे दर हे महानगरपालिका निहाय वेगवेगळे आहेत. त्या दरामध्ये एकसमानता आणण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी केंद्र शासनाच्या ग्रामीण विद्युतीकरण विभागाचे संचालक डॉ. पी. व्ही. रमेश व महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्यात मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.

You might also like
Comments
Loading...