‘एक लोकप्रतिनिधी दुःखद आत्महत्या करतो; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत ?’

ओमबिर्ला

मुंबई: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईत मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला. मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डेलकर हे लोकसभेतील दादरा आणि नगर हवेली मतदार संघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. मोहन डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर आणि दोन मुले अभिनव व दिविता असा परिवार आहे.

मोहन डेलकर हे तब्बल सात वेळा दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते. त्यामुळे आता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात देशभरात खळबळ माजवणाऱ्यांसाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान असल्याच म्हणत आजच्या सामनाच्या रोखठोक सदरामधून या आत्माहत्येवर प्रश्न उपस्थित केला आहे. तर एक लोकप्रतिनिधी दुःखद आत्महत्या करतो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत? असा सवाल करण्यात आला आहे.

‘सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेल्या मोहन डेलकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली? गुजरात, दिल्लीत त्यांची घरे आहेत. पण मुंबईचे पोलीस आपल्या मृत्यूनंतर ‘सुसाईड नोट’ हा पुरावा मानून आरोपींना अटक करतील ही भावना त्यांच्या मनात नक्कीच असेल. लोकसभेत खासदार डेलकर यांना दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहिली जाईल. पण तेवढय़ाने काय होणार? डेलकरांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी संपूर्ण सभागृहात आवाज उठवायला हवा. केंद्रशासित राज्यांत आमदार, खासदारांना, निवडून आलेल्या सरकारांना कसे अपमानित केले जाते त्या दुःखास डेलकरांनी लोकसभेत वाचा फो़ली.

पुद्दुचेरीत तेथील नायब राज्यपाल माजी मुख्यमंत्री नारायणसामी यांना पावलोपावली अपमानित करीत होत्या. तेथे सरकारचीच हत्या झाली व दादरा-नगर हवेलीत खासदार डेलकरांचा बळी घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाने आपल्याला कसे अपमानित केले त्याबाबत डेलकरांनी डोळय़ात पाणी आणून सांगितले. डेलकर अस्वस्थ होते व प्रशासकीय दडपशाहीने ते असहाय्य बनले. त्याच असहाय्यतेतून संसदेचा एक सदस्य, एक लोकप्रतिनिधी दुःखद आत्महत्या करतो. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत?’ असा सवाल आजच्या सामना च्या रोखठोक सदरातून करण्यात आला आहे.’

महत्वाच्या बातम्या