पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढू ; जिग्नेश मेवानी

'युवा हुंकार रॅली' ला पोलिसांनी नाकारली परवानगी

नवी दिल्ली : वडगाम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांच्या संसद मार्ग परिसरात होणाऱ्या ‘युवा हुंकार रॅली’ ला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आम्हाला टार्गेट केले जात असून हे लज्जास्पद आहे. असे मत जिग्नेश मेवानी यांनी स्पष्ट केले.

आम्ही लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने रॅली काढणार आहोत. सरकारने लोकनियुक्ती प्रतिनिधींना बोलण्याची परवानगी द्यायला हवी. तसेच पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढू असे सुद्धा सांगितले. पोलिसांनी हरित लवादाच्या रॅलीच्या आदेशाचे उदाहरण देत परवानगी नाकारली. मात्र, रॅलीचे आयोजक रॅली काढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परवानगी नाकारण्यात आल्याने जर ही रॅली काढली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.