मनमोहन सिंह यांच्या ‘मौनावर’ ए राजा यांचा प्रहार

raja vs manmohan

नवी दिल्ली : दूरसंचार मंत्रालयाच्या प्रत्येक निर्णयाची माहिती मनमोहन सिंह यांना होती. पण त्यांनी कधीही माझा बचाव केला नाही अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर ए.राजा यांनी टीका केली आहे. ए राजा यांनी आपल्या पुस्तकात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावार निशाना साधला आहे. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या न्यायालयाने निर्दोष सुटल्यानंतर एका महिन्यातच माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी ‘2G सागा अनफोल्ड्स’ हे पुस्तक लिहिलं आहे. उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

मनमोहन सिंह यांच्या मौनावर ए राजा यांचा प्रहार

Loading...

दूरसंचार मंत्रालयाच्या प्रत्येक निर्णयाची माहिती मनमोहन सिंह यांना होती. पण त्यांनी कधीही माझा बचाव केला नाही. त्यांचे सल्लागार त्यांना चुकीची माहिती देत होते आणि पीएमओ दूरसंचार लॉबीच्या दबावात काम करत होतं,असं ए राजा यांनी पुस्तकात लिहिलं आहे.22 ऑक्टोबर 2009 सीबीआयने दूरसंचार मंत्रालय आणि काही दूरसंचार कंपन्यांच्या कार्यालयात छापा टाकला होता. त्यादिवशी संध्याकाळी मी पंतप्रधानांना भेटण्यासाठी साऊथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात गेलो. पीएमओचे प्रधान सचिव टीके नायरही तिथे उपस्थित होते. लोकांना आश्चर्य वाटेल पण जेव्हा मी पंतप्रधानांना सीबीआयच्या छाप्यांबाबत सांगितलं तेव्हा त्यांना धक्का बसला.

माजी कॅग विनोद राय यांच्यावर यांच्यावरही निशाना

विनोद राय अशा मांजरीसारखं होते, जी स्वत:चे डोळे बंद करुन संपूर्ण जगात अंधार असल्याचं सांगते. खरंतर विनोद राय सूत्रधाराच्या भूमिकेत होते. त्यांनी काल्पनिक प्रतिमा सादर केली, तिच्यामागे मीडिया आणि विरोधी पक्ष लागले.यूपीए-2 ची हत्या करण्यासाठी राजकीय कट रचण्यात आला होता. यासाठी विनोद राय यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली होती

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला