‘ए. आर. रहमान कोण?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाबरोबरीचा’; दाक्षिणात्य अभिनेत्याचे धक्कादायक विधान

ए आर रहमान

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नंदामुरी बालाकृष्ण यांनी एका मुलाखतीत एक अजब वक्तव्य केले आहे. यामुळे सध्या त्यांची तुफान चर्चा होत आहे. याआधी देखील विविध कारणामुळे ते चर्चेत आले आहे. नंदामुरी बालाकृष्ण यांनी ए आर रहमानविषयी एक वक्तव्य करत ‘भारतरत्न’ हा पुरस्कार हा त्यांच्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे, असे धक्कादायक विधान केल आहे.

नंदामुरी बालाकृष्ण एका तेलुगू वृत्त वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, ‘ए आर रहमान कोण आहे?, मला माहित नाही. मला त्याच्याबद्दल काही वाटतं नाही. दशकातून एकदा तो हिट गाणं देतो आणि ऑस्कर पुरस्कार मिळवतो. ऑस्करच नाही तर ते भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मानत नाही,’ असे नंदामुरी बालाकृष्ण ए आर रहमान यांच्यावर निशाणा साधत म्हणाले आहेत.

नंदामुरी बालकृष्ण पुढे म्हणाले, ‘सर्व पुरस्कार म्हणजे माझ्या पायाच्या धुळी समान आहेत. तेलुगू चित्रपट सृष्टीत माझ्या कुटुंबाच्या योगदानाची बरोबरी कोणताही पुरस्कार करु शकत नाही. मला वाटतं की भारतरत्न हा पुरस्कार एन. टी. आर यांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे. माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या वडिलांना नाही तर या पुरस्कारांना वाईट वाटले पाहिजे की ते आमच्याकडे नाहीत,’ असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे.

नंदामुरी बालकृष्ण याच्या मुलाखतीचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यानी  हॅशटॅग ‘बालकृष्ण कोण आहे?’ असा  ट्रेंड सुरु झाला आहे. नंदामुरी बालकृष्ण हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP