fbpx

काँग्रेसचा शहजादा असलेले राहुल गांधी हे मोबाइल पाहिल्याशिवाय दोन वाक्ये लिहू शकत नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचा शहजादा अशी प्रतिमा असलेले राहुल गांधी हे मोबाइल पाहिल्याशिवाय दोन वाक्ये लिहू शकत नाहीत. १५ वाक्ये लिहायची असतील तरीही ती त्यांना जमणार नाहीत अशात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर १५ मिनिटे बोलायचे आहे, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला आहे.

अशात काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी मी फक्त १५ मिनिटे बोललो तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर काहीही बोलू शकणार नाहीत असे म्हटले होते त्यावर आता भाजपाने त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.