टीम महाराष्ट्र देशा: परदेशामध्ये फिरायला (Travel) जाण्यासाठी व्हिसा (Visa) लागतो असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या देशात म्हणजेच भारतात अशी काही ठिकाणं आहे. जिथे तुम्ही परमिट शिवाय फिरायला जाऊ शकत नाही. भारतामध्ये अनेक ठिकाणी परवानगीशिवाय तुम्हाला फिरता येणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अजून इतर कारणांनी या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी तेथील अधिकृत संस्थांची परवानगी घ्यावी लागते. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.
या ठिकाणी फिरायला (Travel) जाण्यासाठी का आवश्यक आहे परमिट ?
भारतामध्ये काही ठिकाणी जाण्यासाठी परमिट आवश्यक असते. याला परवानगीला इनर लाइन परमिशन असे म्हणतात. या ठिकाणांपासून आंतरराष्ट्रीय सीमा जाते त्यामुळे या ठिकाणांना भेट देण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्या परमिटच्या माध्यमातून तुमची सुरक्षा आणि तुमच्या हालचालींची माहिती तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते. त्याचबरोबर त्या ठिकाणांवरील संस्कृती, सभ्यता आणि चालीरीती इत्यादी गोष्टींची संरक्षण करण्यासाठी देखील हे परमिट आवश्यक आहे. भारतातील पुढील ठिकाणी फिरायला जाण्यासाठी परमिटची आवश्यकता असते.
मिझोराम
बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर वसलेले भारतातील मिझोराम शहर हे पर्यटकांचे आवडते ठिकाणं आहे. पण तुम्हाला मिझोरामला भेट देण्यासाठी परमिट घेणे आवश्यक असते. मिझोरामला भेट देण्यासाठी परमिट काढायला तुम्हाला एक ओळखपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो आणि 120 रुपये शुल्क लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला मिझोरामचा इनर लाईन परमिट मिळेल.
लडाख
एलओसी (LOC) जवळ स्थित असलेल्या लडाख मधील काही ठिकाणांना भेट देण्यासाठी परमिट घेणे आवश्यक असते. यामध्ये नुब्रा व्हॅली, त्सो मोरीरी लेक, खार्दुंग ला पास, दाह, हनु व्हिलेज, पँगॉन्ग त्सो लेक, न्योमा, तुर्तुक, टांगयार इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी इनर लाईन परमिट मिळवण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतात.
नागालँड
नागालँडचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. पण नागालँड मधील कोहिमा, मोकोकचुंग, दिमापुर, मोन इतर ठिकाणांना भेट देण्यासाठी परमिटची आवश्यकता असते. येथील परमिट मिळवण्यासाठी तुम्हाला ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि 50 रुपये द्यावे लागते. त्याचबरोबर येथे तुम्ही 100 रुपयांमध्ये 30 दिवसापर्यंतचा परमिट मिळू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- T20 WC 2022 | “आम्ही त्याला…” ; उपांत्य फेरीपूर्वी बेन स्टोक्सचे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
- Supriya Sule । अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,
- Karuna Sharma | “माझ्या जीवाला काही झालं तर धनंजय मुंडे जबाबदार” ; करुणा मुंडेंचा गंभीर इशारा
- Urfi Javed | संपूर्ण शरीराला बँडेज पट्टी! उर्फी जावेदचा नवा लुक
- Ramdas Kadam । अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; ‘या’ नेत्यांवर टीका करत म्हणाले,