दहा रूपयांची नवी नोट लवकरच, कोणार्क सूर्य मंदिराचे असणार खास चित्र!

update rbi-surveys-shows-consumer-confidence-about-economy-is-declining-employment-most-critical-issue

टीम महाराष्ट्र देशा : नवीन पन्नास व दोनशे रूपयांची नवी नोट बाजारात आल्यानंतर आता नवीन स्वरूपाची दहा रूपयांची नोट लवकरच बाजारात येणार आहे. नवीन दहाची नोट लवकरच आरबीआय जारी करणार आहे.
महात्मा गांधी सीरीज मधील नवीन दहा रूपयांची नोट तपकिरी रंगाची असेल व या नोटेवर खास कोणार्क सूर्य मंदिराचे चित्र असणार आहे. नवीन दहा रूपयांच्या नोटेची आरबीआयने छपाई देखील सुरु केली आहे. या आधी 2005 मधे दहा रूपयांच्या नोटे मधे बदल करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल तेरा वर्षानंतर दहा रुपयाची नोट नवीन स्वरुपात येत आहे.

नवीन दहा रूपयांच्या नोटेचे वैशिष्ट्ये

दहा रूपयांची नोट तपकिरी रंगाची असेल

या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिराचे खास चित्र असणार आहे